पृष्ठे

सोमवार, १३ मार्च, २०२३

अहिरानी बाराखडी

 






अहिरानी बाराखडी

झाली नं तयार अहिरानी बोलीतली आमच्या हक्काची बाराखडी..!

     गेल्या काही दिवसात दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत 'झुंबा विथ खान्देशी गीत' हा उपक्रम सुरू होता.यात गप्पा मारता मारता 'गोंडावाली' शब्दापासून सुरू झालेला प्रवास आपण अहिरानी सचित्र बालमित्र तयार करू शकतो यावर प्रवास थांबला होता.

       चेतना रौंदळ आणि मनस्वी जाधव या चौथीच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेत घरी आपल्या पालकांची मदत आणि रमेश सुर्यवंशी यांच्या अहिरानी भाषेतील शब्दकोशाचा संदर्भ त्यांनी घेतला आणि तयार केला आपला स्वतःचा अहिरानी भाषेतील बाराखडीचा नमुना.नवनिर्मितीचा आनंद लेकरांना घेता आला.

     यात ज्या वस्तू अहिरानीत बोलल्या जातात,दिसतात अशा सर्व वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.पुढे तंत्रस्नेही मुलं पुढचं पाऊल म्हणून सचित्र म्हणून त्यांची चित्र,फोटो संग्रहित करणार आहेत.

      आव्हान दिलं होतं.मुलींनी लिलया पार पाडलं.हवं तेवढं सोपं नाहीच,पण संवादाच्या माध्यमातून हे पार कृरता आलं.अनेक शब्द वाचता आली अन् विशेष वर्णानुक्रमे शब्द शोधण्याची सवय झाली.अनेक नवे शब्द वाचतांना प्रश्नासकट हास्याची लकेरही उमटली.

     संवादातून स्विकारलेलं हे आव्हान खासच होतं.नव्याने मुलींसोबत समृद्ध होता आलं.पुन्हा नव्याने नवा अनुभव मिळेलंच..!

     चेतना आणि मनस्वीनं कौतुकच..!

प्रेरक आहात...!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

#malinagar 
#अहिरानी 
#बाराखडी 
#नवनिर्मिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा