पृष्ठे

ATM संमेलन 2017

माळीनगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वनिर्मित ॲप्सचे राज्यस्तरीय ATM शिक्षण संमेलनात उद्घाटन व चिमुकल्यांचा सत्कार

कोकमठाण शिर्डी येथे पार पडलेल्या दोन दिवसीय कृतीशील शिक्षक महाराष्ट्र राज्यस्तरीय संमेलनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भाषा,गणित,इंग्रजी विषयांचे शैक्षणिक स्वनिर्मित ॲप्सचे उद्घाटन पवन सुधीर NCERT दिल्ली,तृप्ती अंधारे गटशिक्षणाधिकारी लातूर,विक्रम अडसूळ ATM संयोजक व राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांसमवेत पार पडले.
   याच संमेलनात निशीगंध काव्यसंग्रहाबद्दल निशा रौंदळ,MY DREAM इंग्रजी काव्यसंग्रहाबद्दल हर्षल रौंदळ व ॲप्सनिर्मितीबद्दल मानसी बागुल ह्यांचाही गौरव ह्या वेळेस केला गेला.चिमुकल्यांनी मान्यवरांसह उपस्थितांची मने जिंकली..
   MY DREAM हा काव्यसंग्रह राज्यभरातील शिक्षकांना स्वतः हर्षलने भेट दिला.हर्षलचे विशेष कौतुक करत तृप्तीताई अंधारे व पवन सुधीर  यांनी चक्क हर्षलचा अॉटोग्राफ पुस्तकावर घेत उपस्थितांना मोठा संदेश दिला.
   याच संमेलनात प्रगत शाळा करतांना याविषयावर राज्यभरातील शिक्षकांसमोर,पवन सुधीर,राजीव तांबे बालसाहित्यिक यांच्यासमोर सादर करता आले..
याच संमेलनात माळीनगर शाळेचे उपक्रम मान्यवर व राज्यातील उपक्रमशील शिक्षकांसमोर मांडता आले.

ATM संमेलन ऊर्जा देणारं संमेलन...
सोबतीनं समृद्ध होण्याचं संमेलन...
WE ARE ONE हा संदेश देणारं  संमेलन ...
प्रेरणा घ्या,प्रेरणा द्या हा संदेश देणारं संमेलन...

ATM परिवारचा सदैव ऋणी...

*ज्ञानज्योती*
विद्यार्थी स्वनिर्मित ॲप्स
👇🏻📱👇🏻📱👇🏻📱👇🏻📱👇🏻📱👇🏻
http://dnyanjoti.blogspot.in/p/apps-link.html?m=0

















































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा