पृष्ठे

परसबाग

 आमची परसबाग


 #हिरवीशाळा उपक्रमांतंर्गत आमच्या माळीनगर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आम्ही परसबाग मोहिम राबवली.नवीन वर्षात दुंधे ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून शाळेत हक्काचं पाणी आलं.शाळेच्या मागील बाजूची जागा परसबागेकरिता निश्चित झाल्यावर युवा शेतकरींच्या मदतीने ही मोहिम राबवली.


      आमच्या लेकरांनीही कष्ट केलेत मग आमची शेती पिकवण्यासाठी.बागेत फुलझाडं,पीक,झाडे लावण्यात आली.यात कोथींबीर,मुळा,कांदा,लसुण,मेथी,टमाटे,वांगे,मिरची,चवळी,भेंडी,केळी,आंबे,बदाम,कडीपत्ता,कोरफड,पुदीना,अक्कलकरा,झेंडू,पारिजातक,चाफा,ब्रम्हकमळ,लिली,निशीगंध,निवडूंग इ.विविध प्रकारची परसबाग फुलवण्यात आली यात वेळोवेळी पाणी देणे,खत टाकणे,गोमूत्र प्रमाणात देणे सारे आलेच...


        मुलांना आवडेल ते करू दिले जाते.आनंदाने मुलं परसबागेची निगा ठेवतात.निंदणी सहजच करून टाकतात.निरीक्षणातून अन् प्रत्यक्षात होत असलेले शिक्षण हे खासच..परिसराचा अभ्यास परिसरातून झाला  तर तो निश्चितच प्रभावी होतो..!


आमचे पहिले उत्पन्न निघाले..मेथी अन् कोथींबीर...! 


प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळालेय हे फक्त सर्व आजी,माजी विद्यार्थी यांच्या मदतीतून,पालकांच्या,युवा मित्रांच्या अन् दुंधे ग्रामपंचायत यांच्या अनमोल सहकार्यातून..!


प्रेरक आहात..!


प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!




















































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा