पृष्ठे

रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२

महात्मा फुले प्रेरणा कट्टा

 




महात्मा फुले प्रेरणा कट्टा

          'अभ्यासाचं झाड' या संकल्पनेतून अडगळीत पडलेला टेबल झाडाखाली ठेवल्यास त्यावर अभ्यास,गप्पा,वाचन,लेखन करता येईल या उद्देशाने माळीनगर शाळेत आजपासून 'महात्मा फुले प्रेरणा कट्टा' विद्यार्थ्यांकडून स्थापन करण्यात आला.

      विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वर्गातला टेबल स्वच्छ केला.त्यास मिळून सर्वांनी रंग दिला.वाचन कट्टा नाव ठरवणे,झाड निश्चित करत टेबल ठेवण्याची जागा,पाणी मारणे,रांगोळी काढणे,त्यावर मिळून बसण्याचं नियोजन झालं अन् प्रत्यक्षात आज महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रत्यक्षात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्तके वाचन करत महामानवास अभिवादन केले.

       विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला हा 'महात्मा फुले प्रेरणा कट्टा' निश्चितच माळीनगर शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता दिशादायी ठरेल.

        चिमुकल्यांनी महामानवास केलेले अभिवादन प्रेरणादायीच..!

प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!


शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

व्हर्च्युअल ट्रीप विथ एक्सपर्ट



 व्हर्च्युअल ट्रीप विथ एक्सपर्ट


        दुपारचं सत्रात LFW - LeapforWord : English Literacy programme च्या मुंबईस्थित एक्सपर्ट तेजल यांच्याशी माळीनगरच्या विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल ट्रीप व्दारे संवाद साधला.प्रेरणा अभियानात इंग्रजीविषयक अनेक उपक्रमांचा सहभाग केला गेला असल्याने माळीनगर शाळेत LFW चे कामकाज कसे सुरू आहे.विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्याच्या उद्देशाने आनंददायी ट्रीप झाली.

        नियमित पाठविला जाणारा अभ्यास,त्याचा होणारा उपयोग एक्सपर्ट तेजल यांनी जाणून घेतला.यात विद्यार्थ्यांनी इंग्रजी वाचन,शब्दडोंगर,स्पेलिंग लेखन,वाचन,वाक्य बनविणे,स्वर,व्यंजन,इंग्रजी बाराखडी विषयक अनेक उपयुक्त ॲक्टीव्हिटीज  सादर केल्या.तेजल यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांची प्रगती जाणून घेत विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयक असणाऱ्या समज विषयी कौतुक केले.त्यांना नवनव्या टीप्स देत सहजरित्या आपण अभ्यास करावा असा संदेश दिला.

"मुलांनो,तुम्ही LFW चा फारच छान उपयोग करून घेत आहात.तुम्ही खूप तयारी केलीय.मी तुम्हांला नॕशनल लेवल चॕम्पियनशिपकरिता निमंत्रित करते.जेथे अनेक राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग असेल.याल ना..!"

       माळीनगर शाळा राबवत असलेल्या इंग्रजी विषयक उपक्रमांतील सातत्याचं हे यश आहे.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या.!