पृष्ठे

रविवार, ५ मार्च, २०२३

चमत्कारामागील विज्ञान - तानाजी शिंदे

माळीनगर दुंधे शाळेचा दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत उपक्रम

चमत्कारामागील विज्ञान समजून घ्या- 
तानाजी शिंदे 

       जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नेहमीच आपल्याला 'का?' असा प्रश्न पडायला हवा आणि त्याचं उत्तर आपण शोधावयास हवे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन समिती महाराष्ट्र राज्यचे राजाध्यक्ष तथा विशेष पोलीस अधिकारी तानाजी शिंदे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर दुंधे यांनी आयोजित केलेल्या चमत्कारामागील विज्ञान या प्रबोधनपर कार्यक्रमात केले.

       आपल्या प्रत्यक्ष प्रयोग अन् त्यामागे असलेले विज्ञान कसे आहे याची प्रत्यक्ष कृतीच विद्यार्थ्यांना करावयास लावून त्यांनी हसतखेळत मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवला.यात त्यांनी वेगवेगळे हातचलाखीचे प्रयोग दाखवले.बदलणारे फुलांचे रंग,बदलणारे पाण्याचे रंग,पत्ते कसे बदलतात,निर्जीव वस्तूंची हालचाल,दोरीतून तिरंगा झेंडा,नोटा बदलणे,चित्र बदलणे इत्यादी विविध प्रयोगातून होणारी फसवणूक प्रत्यक्ष कृतीतून दाखवत उपस्थित विद्यार्थी पालकांचे प्रबोधन केले.

      प्रबोधन गीत,महापुरूषांचे दाखले देत मनुष्याने स्व कतृत्वाने मोठे व्हावे अन् देशाची सेवा करून श्रद्धा नि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेऊन जीवनात यशस्वी व्हावे असा संदेश त्यांनी दिला.यावेळी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक व युवामित्र उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक भरत पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र रौंदळ,सर्व सदस्य पालक व युवा मित्रांनी प्रयत्न केले.






















 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा