पृष्ठे

गुरुवार, २५ मे, २०२३

निरोप




























 अखेर घेतला निरोप माळीनगर शाळेचा..!

11 वर्षे 9 महिन्यानंतर आज विद्यार्थी,पालक यांच्या उपस्थितीत नूतन मुख्याध्यापक श्री.पवार सर,उपशिक्षक श्री.ठाकरे सर यांचे स्वागत होऊन पालकांशी,विद्यार्थ्यांशी हृदयातलं हृदयापर्यंत बोललो.

मुलांना अन् पालकांना समजावणं तसं कठीण होत होतं.पण नजरेचा खेळ चोरून चोरून का असेना कोपऱ्यात,मान इकडं तिकडं करून दाटलेल्या अश्रूंना वाट करून देणारी लाभलेली संपत्ती कळत होती.पोरं कावरीबावरी झाली होती पण बदल हा स्विकारावाच लागतो.पोरांची प्रश्न सतावत होती..!


"सर,आता कधी याल मग परत..!"😞 


उत्तरं नसलेली प्रश्न समोर आली की निरभ्र आकाशातले ढग अश्रू गाळण्यास सज्ज होताच ...


"अरे,लवकरच .."


सालं पोरांशी खोटं बोलताच येत नव्हतं.आनंदानं निरोप घ्यावा ठरवलं होतं पण दाटलेल्या हुंदक्यांना किती वेळ दाबणार तुम्ही ..! 😞

       आजपर्यंतच्या प्रवासातले खरे वाटेकरी माळीनगरच आहे.इथला युवा म्हणजे आपली ताकद होती.आहे.बदली झाली अन् पालकमंत्री भुसेसाहेब असो की सीईओ नाशिक,शिक्षणाधिकारी नाशिक यांच्यापर्यंत अयशस्वी प्रयत्न करणारे हेच पालक विद्यार्थी होते.

      या कालखंडात माळीनगर शाळेची गुणवत्ताविषयक प्रगती झाली ती फक्त अन् फक्त येथील पालक,विद्यार्थी यांच्यामुळेच.मी कधी शिकवलंच नाही तर शिकू दिलं.त्यामुळेच मुलं गुणवत्ता बाबतीत हवी तशी तयार होत होती.आपली आपण आनंदाने शिकत होती.खरं आनंददायी जीवनशिक्षण देण्याचा प्रयत्न केला.

     या काळात काही उणे असेल ते माझेच मी स्विकारतो.हा प्रवास असाच सुरू राहिल.माळीनगर कायम हृदयस्थानी असेल..!

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!


#malinagar 

#बदली 

#विद्यार्थी 

#पालक 

#शाळा 

#दोस्त 

#निरोप

सोमवार, १३ मार्च, २०२३

अहिरानी बाराखडी

 






अहिरानी बाराखडी

झाली नं तयार अहिरानी बोलीतली आमच्या हक्काची बाराखडी..!

     गेल्या काही दिवसात दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत 'झुंबा विथ खान्देशी गीत' हा उपक्रम सुरू होता.यात गप्पा मारता मारता 'गोंडावाली' शब्दापासून सुरू झालेला प्रवास आपण अहिरानी सचित्र बालमित्र तयार करू शकतो यावर प्रवास थांबला होता.

       चेतना रौंदळ आणि मनस्वी जाधव या चौथीच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेत घरी आपल्या पालकांची मदत आणि रमेश सुर्यवंशी यांच्या अहिरानी भाषेतील शब्दकोशाचा संदर्भ त्यांनी घेतला आणि तयार केला आपला स्वतःचा अहिरानी भाषेतील बाराखडीचा नमुना.नवनिर्मितीचा आनंद लेकरांना घेता आला.

     यात ज्या वस्तू अहिरानीत बोलल्या जातात,दिसतात अशा सर्व वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.पुढे तंत्रस्नेही मुलं पुढचं पाऊल म्हणून सचित्र म्हणून त्यांची चित्र,फोटो संग्रहित करणार आहेत.

      आव्हान दिलं होतं.मुलींनी लिलया पार पाडलं.हवं तेवढं सोपं नाहीच,पण संवादाच्या माध्यमातून हे पार कृरता आलं.अनेक शब्द वाचता आली अन् विशेष वर्णानुक्रमे शब्द शोधण्याची सवय झाली.अनेक नवे शब्द वाचतांना प्रश्नासकट हास्याची लकेरही उमटली.

     संवादातून स्विकारलेलं हे आव्हान खासच होतं.नव्याने मुलींसोबत समृद्ध होता आलं.पुन्हा नव्याने नवा अनुभव मिळेलंच..!

     चेतना आणि मनस्वीनं कौतुकच..!

प्रेरक आहात...!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

#malinagar 
#अहिरानी 
#बाराखडी 
#नवनिर्मिती

शनिवार, ११ मार्च, २०२३

ॲनाग्राम टीम

 


अॕनाग्राम टीम


         मित्रवर्य प्रकाश चव्हाण सरांची आॕनलाईन गेसींग गेमची पोस्ट शाळेच्या गृपवर टाकली.शाळा भरल्यावर चौथीच्या तंत्रस्नेही विद्यार्थ्यांनी,


"सर,आपण पण बनवू शकतो का असंं?" 


"आपल्याला ॲप्स बनवता येतात.मग हे पण बनवता येईल ना?"


      मुलांच्या प्रश्नाचा धागा पकडत.


"वा वा..! मग.का नाही जमणार आपल्याला.."


         जमलेल्या सर्व मुलींना wordwall च्या वॉलवर घेऊन जात सर्व टप्पे समजावून सांगितले.टॕब आणि मोबाईलचा उपयोग करत अक्षरांचीच अदलाबदल होणार असेल तर वर्गातल्या फळ्यावर लिहलेले शेप्स,कलर्स,बर्डस्,नंबर्स इ. विविध प्रकारच्या स्पेलिंग,पुस्तकाची मदत घेत लेकरांनी दणक्यात ॲड फ्रेज करत करत आॕनलाईन गेसिंग बनवला.अनेक पर्याय वाचून आपल्याला हे पण तयार करता येईल,हे पण येईल करत करत पोरं जॕम खुश झालीत.


"आम्ही हे करू शकतो." हे जेवढं महत्त्वाचे तेवढेच वा त्यापेक्षा "का?" असा प्रश्न पडणं हे खासच आहे.


        चव्हाण सरांचा मेसेज हा नाविन्यपूर्ण नवनिर्माण करणारा उपक्रम दिशादायी ठरलाच ; पण योगायोगाने शाळेत आलेला मुलांच्या 'मुन्नाभाऊ'ने मुलांनी तयार केलेला आॕनलाईन गेमची मजा चाखली.मुलांनी तयार केलेल्या आॕनलाईन शब्दसंपत्ती वाढवणाऱ्या ॲनाग्राम गेमचे कौतुक केले.सॉफ्ट स्किल्स तयार होत आहेत मुलांमध्ये.नवं शिकण्याची प्रचंड ऊर्जा मुलांमध्ये असते.फक्त त्यासाठी साधनं उपलब्ध असावीत अन् वेळ खूप महत्त्वाचा.


       ॲनाग्राम म्हणजेच अक्षरांची क्रम बदलवून तयार झालेला शब्द.मुलींची ही टीम म्हणजेच आमची 'ॲनाग्राम टीम' नेहमीच नवे ते करण्यासाठी तयार असते.सातत्याने होणारा बदल अन् 'का?' या प्रश्नाचं उत्तर शोधणारी ही पिढी माळीनगरच्या अनेक नव्या उपक्रमांचे स्रोतच..!


प्रेरक आहात ...!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

https://dnyanjoti.blogspot.com/?m=0


JJS ANAGRAM

https://wordwall.net/resource/53731719


CP ANAGRAM

https://wordwall.net/resource/53731671


SJ ANAGRAM

https://wordwall.net/resource/53731483


CM ANAGRAM

https://wordwall.net/resource/53731575


MALINAGAR ANAGRAM

https://wordwall.net/resource/53657459

रविवार, ५ मार्च, २०२३

चमत्कारामागील विज्ञान - तानाजी शिंदे

माळीनगर दुंधे शाळेचा दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत उपक्रम

चमत्कारामागील विज्ञान समजून घ्या- 
तानाजी शिंदे 

       जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नेहमीच आपल्याला 'का?' असा प्रश्न पडायला हवा आणि त्याचं उत्तर आपण शोधावयास हवे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन समिती महाराष्ट्र राज्यचे राजाध्यक्ष तथा विशेष पोलीस अधिकारी तानाजी शिंदे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर दुंधे यांनी आयोजित केलेल्या चमत्कारामागील विज्ञान या प्रबोधनपर कार्यक्रमात केले.

       आपल्या प्रत्यक्ष प्रयोग अन् त्यामागे असलेले विज्ञान कसे आहे याची प्रत्यक्ष कृतीच विद्यार्थ्यांना करावयास लावून त्यांनी हसतखेळत मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवला.यात त्यांनी वेगवेगळे हातचलाखीचे प्रयोग दाखवले.बदलणारे फुलांचे रंग,बदलणारे पाण्याचे रंग,पत्ते कसे बदलतात,निर्जीव वस्तूंची हालचाल,दोरीतून तिरंगा झेंडा,नोटा बदलणे,चित्र बदलणे इत्यादी विविध प्रयोगातून होणारी फसवणूक प्रत्यक्ष कृतीतून दाखवत उपस्थित विद्यार्थी पालकांचे प्रबोधन केले.

      प्रबोधन गीत,महापुरूषांचे दाखले देत मनुष्याने स्व कतृत्वाने मोठे व्हावे अन् देशाची सेवा करून श्रद्धा नि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेऊन जीवनात यशस्वी व्हावे असा संदेश त्यांनी दिला.यावेळी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक व युवामित्र उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक भरत पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र रौंदळ,सर्व सदस्य पालक व युवा मित्रांनी प्रयत्न केले.






















 

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

व्हर्च्युअल ट्रीप विथ झुंबा इन माळीनगर व्हाया टाकळी विंचूर

 व्हर्च्युअल ट्रीप विथ झुंबा इन माळीनगर व्हाया विंचुर टाकळी


        आज 'नया कुछ सिखते है' या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी विंचूर ता.येवला येथील प्रयोगशील शिक्षक गजानन उदार यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहावे पुष्प गुंफता आले ते 'व्हर्च्युअल ट्रीप विथ झुंबा इन माळीनगर व्हाया विंचूर टाकळी' थेट झूमसोबतच..!

          झुंबा डान्सने मुलांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी,तो का गरजेचा आहे याची थोडक्यात माहिती देण्यात आली.दोन्हीही शाळेतील विद्यार्थ्यांनी झुंबा डान्स हा खान्देशी गीत 'झुमकावाली पोर' या गाण्यावर केला.वन्स मोअरने पुन्हा एकदा एकत्र घेण्यात आला.यात मुलांनी आनंदाने सहभाग नोंदवला.मजा आली.

        ही व्हर्च्युअल ट्रीप मुलांना आनंद देऊन गेली.मुलांना झुंबाने झालेला आनंद त्यांनी दिलेल्या प्रतिसादावरून कळत होता.चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंदच या उपक्रमाचे महत्त्व पटवून देत होता.दोन शाळांची या व्हर्च्युअल ट्रीपने भेट घडवून आणली.असा संवाद होणं आभासी का असेना होणं महत्त्वाचे आहे.

          औपचारिक शिक्षणाच्या पलिकडचं अनौपचारिक शिक्षण मुलांना हवं असतं,फक्त त्याची बांधणी करतांना तो संबंध औपचारिक शिक्षणाशी सहजच जुळवता आला पाहिजे.शारीरिक शिक्षणातले,कला विषयातील बहुसंख्य बाबी या अशाच सहजच मुलांमध्ये रूजवता येतात.'नया कुछ सिखते है' या नाविन्यपूर्ण उपक्रमातून महाराष्ट्रातील प्रयोगशील शिक्षकांचे प्रयोग,थेट संवाद येथील विद्यार्थ्यांशी होतोय हे खास आहे.येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मात करून हवं असलेलं मुलांना उपलब्ध होतेय हे भारीच आहे.

       आयोजक मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी विंचूर ता.निफाड जि.नाशिक यांचे या निमित्तानं ऋण व्यक्त करतो.


प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या...!