अखेर घेतला निरोप माळीनगर शाळेचा..!
11 वर्षे 9 महिन्यानंतर आज विद्यार्थी,पालक यांच्या उपस्थितीत नूतन मुख्याध्यापक श्री.पवार सर,उपशिक्षक श्री.ठाकरे सर यांचे स्वागत होऊन पालकांशी,विद्यार्थ्यांशी हृदयातलं हृदयापर्यंत बोललो.
मुलांना अन् पालकांना समजावणं तसं कठीण होत होतं.पण नजरेचा खेळ चोरून चोरून का असेना कोपऱ्यात,मान इकडं तिकडं करून दाटलेल्या अश्रूंना वाट करून देणारी लाभलेली संपत्ती कळत होती.पोरं कावरीबावरी झाली होती पण बदल हा स्विकारावाच लागतो.पोरांची प्रश्न सतावत होती..!
"सर,आता कधी याल मग परत..!"😞
उत्तरं नसलेली प्रश्न समोर आली की निरभ्र आकाशातले ढग अश्रू गाळण्यास सज्ज होताच ...
"अरे,लवकरच .."
सालं पोरांशी खोटं बोलताच येत नव्हतं.आनंदानं निरोप घ्यावा ठरवलं होतं पण दाटलेल्या हुंदक्यांना किती वेळ दाबणार तुम्ही ..! 😞
आजपर्यंतच्या प्रवासातले खरे वाटेकरी माळीनगरच आहे.इथला युवा म्हणजे आपली ताकद होती.आहे.बदली झाली अन् पालकमंत्री भुसेसाहेब असो की सीईओ नाशिक,शिक्षणाधिकारी नाशिक यांच्यापर्यंत अयशस्वी प्रयत्न करणारे हेच पालक विद्यार्थी होते.
या कालखंडात माळीनगर शाळेची गुणवत्ताविषयक प्रगती झाली ती फक्त अन् फक्त येथील पालक,विद्यार्थी यांच्यामुळेच.मी कधी शिकवलंच नाही तर शिकू दिलं.त्यामुळेच मुलं गुणवत्ता बाबतीत हवी तशी तयार होत होती.आपली आपण आनंदाने शिकत होती.खरं आनंददायी जीवनशिक्षण देण्याचा प्रयत्न केला.
या काळात काही उणे असेल ते माझेच मी स्विकारतो.हा प्रवास असाच सुरू राहिल.माळीनगर कायम हृदयस्थानी असेल..!
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!
#malinagar
#बदली
#विद्यार्थी
#पालक
#शाळा
#दोस्त
#निरोप